उस्मानाबाद : हिंदुस्थानचे आराध्य दैवत रयतेचा जाणता राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८४ व्या जन्मोत्सवानिमित्त उस्मानाबाद शहरासह संपूर्ण जिल्हा भगवामय झाल्याने शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवभक्तांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने १४ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. १८ पासून शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दर्जेदार कार्यक्रम सप्ताह सुरू झालेला आहे.
उस्मानाबाद शहरात शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहर भगव्या पताक्याने भगवेमय करण्यात आले आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समिती व शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोटार सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीसाठी संपूर्ण जिल्हाभरातील शिवप्रेमी भक्त स्वइच्छेने सहभागी होत आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वासरूढ पुतळ्यास आकर्षक पद्धतीने विद्युत रोषनाई करण्यात आल्याने शिवाजी चौक परिसर खुलून निघाला आहे. शहरातील प्रत्येक चौकात लहान मोठ्या शिवभक्तांनी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून शिवसप्ताहानिमित्त बाल मावळ्यांसाठी विविध पद्धतीच्या स्पर्धा घेऊन संपूर्ण शहर भगवेमय बनवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अनेक नामवंत शहरात दाखल होणार आहेत.
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात शिवभक्तांनी शिव प्रतिमेचे पुजन करून भगव्या वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी मावळे सज्ज झाले आहेत.