उस्मानाबाद :- जिल्ह्यातील  सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, पक्षकार आणि सर्व सबंधित विभाग प्रमुख, बँक व्यवस्थापन आदिंना सूचित करण्यात येते की, येत्या 12 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी स्वरुपाचे खटले, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात/ कामगार नुकसान भरपाई त्याचप्रमाणे वादपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
       जास्तीत जास्त पक्षकारांनी या संधीचा लाभ घेवून त्यांची न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवून सामंजस्याने मिटवून घ्यावीत आणि पैसा व वेळ वाचवावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठस्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. बी. मोरे यांनी केले आहे.
 
Top