उस्मानाबाद :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत बीजभांडवल, एनएसएफडीसी योजना, महिला समृध्दी योजना, लघुऋण वित्त योजनेअतर्गत ज्या समाज बांधवानी लाभ घेतला आहे, त्यांनी आपल्या कर्जाची थकबाकी महामंडळाच्या कार्यालयात त्वरीत भरण्याचे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दि. खं. खुडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
कर्जदारांनी त्यांची थकबाकी न भरल्यास त्यांचे जामीनदार तसेच जामीनदारांचे कार्यालय प्रमुख यांच्याकडे वसुलीसाठी तगादे लावून वसुली करण्यात येईल याची संबधित लाभधारकांनी नेांद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.