उस्मानाबाद :- विधी सेवा प्राधिकरण  व धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने येत्या 12 एप्रिल रोजी येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
       इच्छुक पक्षकार, विधीज्ञाकडील सार्वजनिक न्यास/संस्थेबाबतची प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखी पत्र 29 मार्चपर्यंत पाठवावे. तसेच आपले नाव व भ्रमणध्वनी क्रमांक कळविणे आवश्यक आहे असे सहायक धर्मादाय आयुक्त,उस्मानाबाद विभाग, उस्मानबाद यांनी कळविले आहे.
 
Top