उस्मानाबाद :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंठ्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-या ज्या महाराष्ट्रीय   नवयुवक/ युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखत मिळालेल्या उमेदवारांसाठी एएसबी मुलाखतीचे पुर्व तयारीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग  19 ते 28 मार्च,2014 या कालावधीत आयोजित करण्यात आले  आहे.
       पात्र उमेदवारांनी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
 
Top