उस्मानाबाद :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत समाजसेवा व श्रमसंस्कार शिबीर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचा समारोप जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पार पडले.
       याप्रसंगी डॉ. आवटे म्हणाल्या की श्रमाची सुरुवात प्रत्येक  विद्यार्थ्यांनी स्वत:पासून घर, शाळा व समाजातून सुरुवात करण्याचा मोलाचा सल्ला दिला. श्री. दानवे यांनी सध्याचे युग हे धावते युग असल्याने विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या तयारीने वाटचाल करावी, असे सागितले.
      प्रास्ताविक गजधने ए. के. यांनी केले. त्यांनी  शिबीर आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. सूत्रसंचलन पुजा भेाईटे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. दहिहंडे यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी श्री. गजधने, श्रीमती भोसले, पठण तबस्सुम, श्रीमती उस्मानी शाहीन तसेच सेवापुर्व विभाग प्रमुख डॉ. जटनुरे यांनी केले. संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top