उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
     अर्ज मागे घेणा-या उमेदवारात प्रताप विलासराव जाधव (अपक्ष, रा. चिलवडी,         ता.उस्मानाबाद), अॅड. भाऊसाहेब अनिल बेलुरे (अपक्ष,रा.शिवाजीनगर, सांजा रोड, उस्मानाबाद), इंगळे भिमा आंबादास (अपक्ष,मु.कन्हेरी पो.पार्डी ता. वाशी), रामजीवन पंढरी बोंदर (अपक्ष,मु. वडगाव (शि), पो. निपाणी ता.कळंब),ज् ञानदेव श्रीमंत रणदिवे (शिवराज्य पक्ष, मु.पो. सारोळा बु. ता.जि.उस्मानाबाद), राणा जगजितसिंह पाटील (अपक्ष, मु.पो. तेर ता,जि. उस्मानाबाद), शेख वाजेद अब्दुल करीम (अपक्ष, सावरकर चौक, अरब गल्ली, उस्मानाबाद), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (अपक्ष, मु.पो. तेर ता,जि.उस्मानाबाद), धनंजय उत्तम सावंत (अपक्ष, मु.पो. सोनारी ता. परंडा जि.उस्मानाबाद), शेषकला विनायक पाडूळे (अपक्ष, मु.भिकार सारोळा पो. पळसप ता.जि.उस्मानाबाद), रवि रत्नाकर होनराव (अपक्ष, मु.पो. कोरफळे,ता.बार्शी जि. सोलापूर), शेषराव त्रेंबकराव पाटील (अपक्ष,मु.पो.तपसे चिंचोली,ता.औसा, जि.लातूर) यांचा समावेश आहे.   
 
Top