उस्मानाबाद :- जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि.30 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची उप शिक्षणाधिकारी गट ब चाळणी परीक्षा-2013 सकाळी 9 ते  10-30  या कालावधीत 6 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता  1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
    उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी विदयालय, श्रीपतराव भोसले हायस्कुल,जुनी इमारत, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (पहिला मजला) नवीन इमारत, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (दुसरा मजला) नवीन इमारत, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (तिसरा मजला) नवीन इमारत आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला,उस्मानाबाद येथे चाळणी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे.
    परीक्षार्थींना कसलाही अडथळा होवू नये म्हणून परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करणे, परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स, फॅक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा भ्रमणध्वनी, मोबाईल, संगणक, गणकायंत्र कॅललेटर  आदि साहित्य पुरवठा करण्यास/ नेण्यास बंदी करण्यात आली आहे. बुथ,ध्वनीक्षेपक,कॉम्प्युटर सेंटर,इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. मोबाईल,फोन,सेल्युलर,फोन,ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
    परीक्षेसंबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश राहणार नाही. फक्त परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेल्या अधिकारी/कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी /कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील.
    परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हा आदेश दि.30 मार्च रोजी  सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लागू राहील.
 
Top