उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबादचे मार्ग तपासणी पथकामार्फत विशेष  तपासणी मोहिम राबविण्यात आली. विशेष तपासणी मोहिमेत 8 हजार 137 बसेसची तपासणी केली असता यात विनातिकीट प्रवास करणारे  78 प्रवासी आढळून आले. विना तिकीट प्रवास केल्याबदृल प्रवासभाडे 4 हजार 449, दंडापोटी 9 हजार 986 रुपये दंड आकारण्यात आला.  प्रवास भाडे व दंड  अशी एकुण 14 हजार 434 रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती राज्य  मार्ग परिवहन मंडळ, उस्मानाबादचे विभाग नियंत्रक, भानप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
     विभाग नियंत्रक नवनीत भानप, वाहतूक अधिकारी एस. एम. ए. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पाटील, ए. सी. गायकवाड, आर. आर. जगताप, एन. एम. जमादार यांनी ही कामगिरी केली.                     
 
Top