बार्शी -: तुळजापूर रोड नाक्यापासून आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार विक्रम अशोक सावळे यांचे आगमन होताच आदली व रणवाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका प्रमुख ऍड. श्रीकांत सुरवसे, शहर प्रमुख सिकंदर आतार, माजी सैनिक, मौलाभाई शेख, सुरेश साबळे, यशवंत सावळे, संतोषभाऊ सावळे, सर्व सावळे बंधु मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी तुळजापूर रोडवरील हनुमंत मंदीरात नारळ फोडून पद यात्रेस सुरूवात झाली. या भव्य मोठ्या रॅलीमध्ये मतदार संघातील आपच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍याचा समावेश होता.
    ही रॅली तुळजापूर नाक्याहून निघून एस.टी स्टॅण्ड चौकातून - पोष्ट चौक, बाळेश्‍वर नाका, कुर्डुवाडी रोड मार्फत शिवाजी कॉलेज रोड - कोर्ट चौकातून तानाजी चौक येथे कॉर्नर बैठक घेण्यात आली. यावेळी विक्रम सावळे यांनी भाषण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक मौलाभाई शेख, पोपट वीर यांची प्रमुख उपस्थिती होते. या पदयात्रेमध्ये सुरेश साबळे यांनी घोषणाबाजी देत सर्व बार्शीकरांचे लक्ष आकर्षीत केले होते. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top