पांगरी (गणेश गोडसे) : पांगरी (ता. बार्शी) येथील दोन परिक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणा-या माध्यमिक व पुर्व माध्यमिक परिक्षा चोख बंदोबस्तात कोणताही गैरप्रकार न होता रविवार रोजी शांततेत पार पडली.
पांगरी येथिल जिल्हा परिषद प्रशालेतील पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा केंद्रावर 187 विदयार्थांनी परिक्षा दिली. भाषा, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, बुदधीमत्ता, सामान्य विज्ञान या विषयांची परिक्षा घेण्यात आली. गतवर्षीपासुन जिल्हा परिषद शिक्षकाऐवजी माध्यमिक शिक्षकांना सुपरव्हीजन केंद्रसंचालक यासह विविध परिक्षा प्रक्रियेत सामावुन घेतले जाते. येथिल परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणुन भोसले जी.जी यांनी व केंद्रप्रमुख म्हणुन श्रीहरी गायकवाड यांनी काम पाहिले. तर मुख्याध्यापक अंकुश लाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गोडसे, सदस्य अमृत आरोळे यांनी बैठक पथकाचे काम पाहीले. जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रात पांगरीतील तिन शाळांसह कारी, टोनेवाडी, झानपुर, ममदापुर, गायकवाड वस्ती, चिंचोली, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, उक्कडगांव येथील विद्यार्थांनी परिक्षा दिली.