उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील उद्या मंगळवार दि. 25 मार्च रोजी क्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता उस्मानाबाद शहरातील तुळजापूर रोडवरील अण्णाभाऊ साठे चौक येथून पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचा लेडीज क्लब येथे सभेने समारोप होणार असून, त्यानंतर 1 वाजता डॉ. पाटील जिल्हा निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पदयात्रा व सभेसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी स्वत:च्या जबाबदारीने स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले आहे.