तुळजापूर :- एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह तुळजापूर शहराजवळील पाचुंदा तलावात आढळल्‍याची घटना रविवार दि. 23 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्‍याच्‍या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    तुळजापूर शहराजवळील पाचुंदा तलावात रविवारी दुपारी अडीच वाजण्‍याच्‍या दरम्‍यान एक मृतदेह दिसून आला. याबाबत तत्काळ तुळजापूर पोलिसांना कळविण्यात आले. सदरील मृतदेह साधारणत: 20 वर्षीय तरुणीचा असून, अंगात निळ्या रंगाची जीन्स व पांढर्‍या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. शर्टवर आयएम असे लिहिलेले असून रंगपंचमीचा पिवळा रंगही कपड्यांवर लागल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
Top