उस्मानाबाद :- लोकसभा निवडणुकींसाठी शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रा. रविंद्र विश्वनाथ  गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   धार्मिक स्थळ परिसरात घोषणा देणे, विना परवाना वाहने रॅलीत समावेश करणे, विनापरवाना वाहनाचा वापर करणे,  मतदारांना जेवणाचे प्रलोभन देणे, सभाखर्च अंदाजपत्रकात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देणे व खर्च लपवणे, रस्त्यावर वाहने उभी करुन वाहतूकीस अडथळा निर्माण करणे,  विनापरवाना लोकांची वाहतूक करणे आदींबाबत श्री. गायकवाड व इतर सहका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आचारसंहिता भरारी पथक प्रमुख शशीकांत विडेकर यांनी फिर्याद दाखल केली होती.
    प्रा. गायकवाड यांच्यासह मधुकर कुलकर्णी (रा. चोराखळी), भागवत बळीराम चव्हाण (रा.कास्ती बु). बाबासाहेब कल्याण  आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या दरम्यान उस्मानाबाद येथील धारासूर मर्दिनी, गाझी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद ते छायादिप लॉन्स देशमुखनगर, उस्मानाबाद येथे घडल्याचे पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.   
 
Top