बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा अथवा पक्षाचा प्रचार करायचा याबाबत माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा संभ्रम आजही कायम आहे. यावर विचारविनीमय करण्यासाठी शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यात काही जणांनी आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे उमेदवाराचा प्रचार करा, काही जण म्हणाले अपक्ष उभे असलेल्या रोहन देशमुख यांचा प्रचार करा तर बहुतांश लोकांनी शिवसेनेचा प्रचार करण्याचा आग्रह धरला. उपस्थितांपैकी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा कल हा शिवसेनेचा प्रचार करावा असाच होता. यचवर २९ तारखेला आणखी सर्व गावातील कार्यकर्त्यांसोबत मोठी बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगीतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, विश्वास आण्णा शिंदे, केशव घोगरे, विनोद काटे, मधुकर जगदाळे, माळी सर, राजाभाऊ काकडे, अरुण बारबोले, संतोष निंबाळकर, सोमनाथ पिसे, किशोर मांजरे, घबाडे आण्णा, कौरव माने, अशोक बोकेफोडे, दादा गायकवाड, सुभाष जाधवर, दिपक सुरवसे, गिरीश बरीदे, विजय लोमटे, पवन बाफणा, महेदीमियॉं लांडगे, प्रमोद वाघमोडे, उमेश काळे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत म्हणाले, दररोज सकाळी चार गावे अन सायंकाळी चार गावांत जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेत आहे. आणखी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यांची मते जाणून घ्यायचे आहे त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. लोेकसभेमध्ये आपल्याला रस नाही परंतु आगामी विधानसभेच्या दृष्टीने जास्त फायदेशीर असलेला निर्णय यावेळी घेण्यात येईल. अनेक कार्यकर्त्यांची वेगवेगळी मते असली तरी त्याचा दूरगामी होणारा परिणाम आणि आपल्या कार्यकर्त्यांना फायदा मिळवून होणारी कामे याचा विचार करावा लागेल.