उस्मानाबाद -: निवडणूक कालावधीसाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता पालन होतेय की नाही, हे पाहावे. भरारी पथकांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकारेपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिल्या आहेत.
    सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी त्यांच्या अधिपत्याखालील भरारी पथकांना याबाबत सूचना द्याव्यात. त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, याची जबाबदारी संबंधित भरारी पथकांवर राहील. त्यामुळे त्यांनी सतर्क राहावे. त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील सर्व बाबींकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना यंत्रणेने दिल्या आहेत.
 
Top