उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी सोमवार, दि. 24 मार्च रोजी सात नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. इंगळे भिमा आंबादास (अपक्ष,मु.कन्हेरी पो.पार्डी ता. वाशी), पाटील मनोहर आनंदराव(अपक्ष, मु.पो. मंगरुळ ता. औसा, जि. लातूर), सचिन मच्छिंद्र इंगोले ( महाराष्ट्र नव निर्माण सेना, मु. रुई पो. पिंपळगाव( क), ता. वाशी ) ढाले पद्मशील रामचंद्र, ( बहुजन समाज पार्टी, आर्शीर्वाद निवास, श्री गॅस एजन्सी जवळ न्यू हडको, तुळजापूर जि. उस्मानाबाद) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. तर रामजीवन पंढरी बोंदर (मु. वडगाव (शि), पो. निपाणी ता.कळंब) यांनी अपक्ष आणि आम आदमी असे दोन अर्ज दाखल केले आहेत तर दि.22 रोजी नामनिर्देशनपत्र सादर केलेल्या रविंद्र विश्वनाथ गायकवाड (शिवसेना, रा.मु.आष्टा,पो.चिंचोली, ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा) यांनी आज आणखी एक अर्ज दाखल केला. ही माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.