कळंब -: वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद उस्‍मानाबादच्‍यावतीने कळंब येथे वीर भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांच्‍या शहीद दिनानिमित्‍त अभिवादन करण्‍यात आले.
         भारत देशात इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्‍य केले. अनेक अत्‍याचार, जुलूम येथील जनतेवर करुन राज्‍य प्रस्‍तापित केले. इंग्रजांच्‍या गुलामगिरीला धुडकावणारे शिवशिष्‍य वीर भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांनी आपलेपण पणाला लावुन देशाच्‍या रक्षणांसाठी इंग्रजांविरूद्ध बंड पुकारले. दि. 23 मार्च 1931 साली भगतसिंह यांना फाशी देण्‍यात आली. म्‍हणून 23 मार्च हा शहीद दिन मानण्‍यात आला.
        कळंब येथील शिवाजी चौक येथे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष सागर बाराते यांच्‍या नेतृत्‍वाखाली प्रतिमा पूजन करुन शहिदांना अभिवादन करण्‍यात आले. यावेळी शिवाजी गिड्डे, नृसिंह वाघमारे, शहराध्‍यक्ष राजेश काळे, बालाजी सुरवसे, विनोद यादव, अशोक इंगळे, कृष्‍णा भाकरे, मुकूंद शेळके, कृष्‍णा चव्‍हाण, शिवकुमार खबाले, गोविंद चौधरी, विशाल गायकवाड यांच्‍यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top