उस्मानाबाद -:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा यंदा 16 मार्च ऐवजी दिनांक 23 मार्च, 2014 रोजी घेण्यात येणार आहे.  
     पूर्व घोषीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 16 मार्च 2014 रोजी होणार होती.  या दिवशी होळीचा सण असल्यामुळे परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची मागणी राज्यभरातून करण्यात आल्यामुळे या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा 23 मार्च रोजी घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  यांनी कळविले आहे.
     या परीक्षेबरोबर दरवर्षी प्रमाणे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, भटक्या जाती-विमुक्त जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही 23 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.  परीक्षेच्या तारखेशिवाय वेळापत्रकात अन्य कोणताही बदल करण्यात आला नाही.  बदललेल्या तारखेची नोंद परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top