उस्मानाबाद :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूका- 2014 साठीची आदर्श आचार संहिता, बुधवार दि. 5 मार्च पासून लागू केली असून विनाअडथळा, निर्भय वातावरणात व शांततेच्या वातावरणात निवडणूका पार पाडता यावे यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे कोणत्याही तीन वाहनांचा ताफा काढण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जारी केले होते. सदर आदेशात अंशता बदल करण्यात आला असून भारत निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचनेनुसार आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये प्रचारामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार, विविध पदाधिकारी, नेते यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कोणत्याही परिस्थीतीत आता 10 पेक्षा जास्त असणार नाही असे आदेश जारी करण्यात आले आहे. मात्र या संदर्भातील पूर्वकल्पना जिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, त्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देणे बंधनकारक असणार आहे.
जिल्हयाच्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनांच्या ताफयात 10 पेक्षा अधिक वाहनांचा समावेश करु नये. या आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188, 425, 426 व 427 व फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 133 प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील. या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली असून ते 28 मे पर्यंत लागू राहील.