कळंब -: शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात आजीवन शिक्षण आणि विस्‍तार विभाग डॉ. बाबासाहेब अंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद व महाविदयालय यांच्‍या संयुक्‍त विदयमाने दि. 5 व 6 मार्च रोजी दोन दिवसीय समुपदेशन व व्‍यक्तीमत्‍व विकास शिबीर संपन्‍न झाले. याप्रसंगी उदघाटक म्‍हणून महाविदयालयाचे प्रा डॉ. अशोकराव मोहेकर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना प्रा. डॉ मोहेकर यांनी विदयार्थ्‍यांनी प्रतिकुल परिस्‍थतीतही अनुकूलता शोधून यश संपादन करावे. प्रतिकुल परिस्थितीतच माणसं घडतात, असे सांगितले. अध्‍यक्षस्‍थानी डॉ.एस.एम कांबळे होते. उदघाटन नंतरच्‍या दोन दिवसाच्‍या चार सत्रात व्‍यक्‍तीमत्‍व विकास आणि विद्यार्थी व्‍यक्‍तीमत्‍व विकासात प्रेरणेचे महत्‍व व्‍यवसायिक लेखनाचे स्‍वरूप व महत्‍व, अर्ज, बायोडाटा अहवाल व बातमी लेखनतंत्र याविषयावर डॉ. डी.एस साकोळे, डॉ.डी.ई गुंडरे, प्रा. डी.एस सुर्यवंशी, डॉ. के. डी जाधव, यांची व्‍याख्‍याने झाली तर या चार सत्रात अध्‍यक्ष म्‍हणून प्रा एस. एन मानकरी, डॉ. डी. एस. जाधव, डॉ.एम. डी. गायकवाड, व प्रा. एच आर अडसुट यांनी अध्‍यक्षीय समारेप केला.
     या शिबीराचे संयाजक प्रा केदार काळवणे, प्रा. आर.व्‍ही. ताटीपामुल, व प्रा. एन.एम अंकुशराव यांनी केले. या शिबीरात महाविदयालयातील 50 विदयार्थी उपस्थित होते.
 
Top