बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे टी.डी.एफ.चे अधिकृत उमेदवार गणपत तावरे, गजेंद्र ऐनापूरे, सहाय्यक आयुक्त राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
    रविवारी दि. २ रोजी बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली प्रशालेच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहकार्यवाह शिवाजीराव जमाले, जिल्हाध्यक्ष मुकूंद साळुंके, निलकंठ लिंगे, जिल्हासचिव सचिन झाडबुके, सुधीर खाडे, आर.बी.पवार, जयकुमार कुंभारे, दत्तात्रय पंडित, रविंद्र मठपती, समता दळवी, विजय करजगी यांच्यासह विविध तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी गजेंद्र ऐनापूरे बोलताना म्‍हणाले, शिक्षक संघटनांत फुट पाडली जात आहे, भविष्‍यात सर्व शिक्षक संघटनांनी एका व्‍यासपीठावर येण्‍याची गरज आहे. महाराष्‍ट्र राज्‍य सरकारी, निमसरकारी कर्मचारी महामंडळाकडून शिक्षक संघटनांना विश्‍वासात घेतले जात नसल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माध्‍यमिक शिक्षकांतील लोकसेवा आयोग परीक्षा उत्‍तीण होत सहाय्यक आयुक्‍त तसेच महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषदपदी निवड झालेल्‍या राजेश क्षिरसागर यांना गौरविण्‍यात आले.
    आदर्श शिक्षक पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात आलेले शिक्षक पुढीलप्रमाणे : हरिश्‍चंद्र कोरे (पंढरपूर), रंगनाथ शिंदे (मोहोळ), सोमेश्‍वर घाणेगावकर (बार्शी), रणजित लोहार (माळशिरस), विठ्ठल एकमल्‍ली (मंगळवेढा), महेंद्र मागाडे (सांगोला), निंगप्‍पा मोकाशी (दक्षिण सोलापूर), दिपक भोसले (उत्‍तर सोलापूर), अनिल देशमुख (अक्‍कलकोट), गोविंद सारोळकर (करमाळा), समता दळवी (माढा), गणपत बाणेगाव (सोलापूर) आदींचा यावेळी गौरव करण्‍यात आला.
 
Top