उस्मानाबाद :- लेखा व कोषागारे विभागाच्या मराठवाडा विभागाचे  वेतनपडताळणी  पथक दि. 13 ते 15 मार्च, या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहे. या दौ-यात हे पथक सेवापुस्तकांची  पडताळणी करणार आहेत.
        दि. 11 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद आणि दि. 12 ते 15 मार्च या कालावधीत जिल्हा व तालुकास्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे.
       सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन/ लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत, वेतन पडताळणीस सेवापुस्तके सादर करण्यापूर्वी सर्व आहरण व संवितरण शासन निर्णय वित्त विभाग क्र वेपुर/1299/ प्र. क्र.5/99 सेवा-10 दिनांक 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबधिताच्या सेवा पुस्तकात लावून सेवापुस्तके पडताळणीस सादर करावीत. तसेच संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रणालित डीडीओ लॉगीन  करावे. DDO Login करावे.DDO Login करण्यासाठी BDS साठी वापण्यात येत असलेले Username and Password वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करावयाची आहे, त्या कर्मचाऱ्यांचे  सेवार्थ Employee ID टाकुन Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल, त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे सहासंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी कळविले आहे.                                     
 
Top