उस्मानाबाद :- विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांना गुरुवार रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबतची माहिती देण्यात आली.
मतदानाची प्रक्रिया कशी होणार आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन कसे आहे, एखादे बटण दाबले तर त्यावर दिसणारे आकडे आदींबाबत असणारे विविध गैरसमजूतीही या प्रात्यक्षिकातून दूर करण्यात आल्या. यावेळेस प्रथमच मतदारांना नकारार्थी मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. त्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभुदय मुळे, उपजिल्हाधिकारी बी.एस. चाकूरकर, तहसीलदार सुभाष काकडे यांनी या ईव्हीएम मशीनची माहिती उपस्थितांना दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.