उस्मानाबाद -: 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आता 27 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 39 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे.
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांची चिन्हे पुढीलप्रमाणे - प्रा.रविंद्र विश्वनाथ गायकवाड (रवीसर) (शिवसेना, मु.आष्टा,पो.चिंचोली (ज), ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा),निवडणूक चिन्ह- धनुष्यवाण,
ढाले पद्मशील रामचंद्र (बहुजन समाज पार्टी, आर्शीर्वाद निवास, श्री गॅस एजन्सी जवळ न्यू हडको, तुळजापूर जि. उस्मानाबाद) चिन्ह -हत्ती,
डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, मु.पो.तेर ता,जि.उस्मानाबाद ), चिन्ह-घडयाळ.
नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार) खालीलप्रमाणे आहेत.
पुष्पाताई तरकसे (हिंदुस्थान निर्माण दल, मु.पो. मेंढा, ता,जि, उस्मानाबाद) चिन्ह-नारळ,  रेवण विश्वनाथ भोसले (जनता दल सेक्यूलर, रा. ईट, ता. भूम) चिन्ह-डोक्यावर भारा घेतलेली स्त्री, डॉ. रमेश सुब्बाराव बनसोडे ( रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, नगर परिषद समाजमंदीरजवळ, भीमनगर, उस्मानाबाद) चिन्ह-पतंग, मिलींद सोमनाथ रोकडे (भारीप बहुजन महासंघ, कामठा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद)-चिन्ह-कपबशी,  विक्रम अशोक सावळे (आम आदमी पार्टी, सावळे चाळ,सोलापूर रोड,मु.पो.बार्शी जि. सोलापूर) चिन्ह-झाडू, राजेंद्र (राजाभाऊ) भैरवनाथ शिंदे ( महाराष्ट्र परिवर्तन सेना (टी), रा. खासापूरी नंबर दोन, ता. परंडा जि. उस्मानाबाद) चिन्ह-कात्री, ॲड. शैलेंद्र रामेश्वर यावलकर (समाजवादी पार्टी, आनंद नगर, उस्मानाबाद) चिन्ह-सायकल, सय्यद मोहम्मद सय्यद इब्राहीम (बहूजन मुक्ती पार्टी, आजाद नगर, परळी  ( वैजनाथ), जि.बीड) चिन्ह-खाट.
    इतर उमेदवार (अपक्ष उमेदवार) खालीलप्रमाणे आहेत.
    अल्ताफ हुसेन येणेगुरे (अपक्ष, किशन चौक, माळी गल्ली, मुरुम ता.उमरगा, जि.उस्मानाबाद) चिन्ह- डिझेल पंप,  काकासाहेब बाबुराव राठोड (अपक्ष, समता नगर, उस्मानाबाद) चिन्ह-अंगठी,  उमाजी पांडूरंग गायकवाड (अपक्ष, मु.पो. औराद ता.उमरगा, जि. उस्मानाबाद) चिन्ह-टेबल, रविंद्र विश्वनाथ गायकवाड (अपक्ष, मु.पो. डिग्गी, ता.उमरगा जि.उस्मानाबाद) चिन्ह-विजेचा खांब, श्रीमती उज्वला  एकनाथ जाधव (अपक्ष, रा. दासरी प्लॉट, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) चिन्ह-प्रेशर कुकर, तुकाराम दामु गंगावणे (अपक्ष, मु.पो.ता. परंडा जि. उस्मानाबाद) चिन्ह-दूरदर्शन, तुपसुंदरे बालाजी बापूराव (अपक्ष, विकास नगर, उस्मानाबाद) चिन्ह-शिटटी, नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष, रा. उपळा पाटी माकडाचे, ता.उस्मानाबाद) चिन्ह- अॅटोरिक्षा, पद्मसिंह विजयसिंह मुंढे पाटील (अपक्ष, मु.पो.वडगाव (ज), ता.कळंब, जि. उस्मानाबाद) चिन्ह-कॅमेरा, पाटील मनोहर आनंदराव (अपक्ष, मु.पो. मंगरुळ ता. औसा, जि. लातूर)चिन्ह-शटल, रोहन सुभाष देशमुख (अपक्ष, रा.पोहनेर, ता. उस्मानाबाद) चिन्ह-शिवणयंत्र, शेख मुबारक उर्फ नाना मैनोद्यीन (अपक्ष, सांजा रोड, उस्मानपूरा ता,जि.उस्मानाबाद) चिन्ह-बॅट, बौडीवाले सिद्दीक इब्राहीम उर्फ गोलाभाई (अपक्ष,मु.पो.बेंबळी ता.जि.उस्मानाबाद) चिन्ह-गॅस सिलेंडर, सुशिलकुमार विनायक पाडूळे (अपक्ष, मु.भिकार सारोळा पो. पळसप ता.जि.उस्मानाबाद) चिन्ह-केटली, प्रा.विजय मारुती क्षीरसागर (अपक्ष, मु.पो. तीर्थ खुर्द ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद) चिन्ह-काचेचा पेला आणि अॅड. शिवाजी जगन्नाथ क्षीरसागर (अपक्ष,नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड, बार्शी जि. सोलापूर) चिन्ह- चपला.
 
Top