सोलापूर :- 43 - माढा लोकसभा मतदारसंघातून आज शुक्रवार दि. 28 मार्च रोजी 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
       अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी संजय कृष्णदेव महाडीक, गणपत परमेश्वर भोसले व संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
       42 - सोलापूर लोकसभा मतदारसंघातुन एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही.
 
Top