सोलापूर -: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 च्या 42- सोलापूर (अ.जा.) मतदार संघातील उमेदवारांना उद्या 29/03/2014 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेता येईल असे 42- सोलापूर (अ.जा.) मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्राकाद्वारे कळविले आहे.
     उमेदवारी मागे घेण्याचे ठिकाण जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, सिध्देश्वर पेठ, सोलापूर 413003 आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवार स्वत: किंवा उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारांचे सूचक किंवा उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी अर्ज सादर करावयाचा झाल्यास त्यांना संबंधित उमेदवाराने प्राधिकृत करणे बंधनकारक आहे. दिनांक 29/03/2014 रोजी दुपारी 3.00 नंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, सिध्देश्वर पेठ सोलापूर 413003 येथे चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर हे सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहेत.
    या मतदारसंघामध्ये विहित मुदतीत 49 उमेदवारांनी एकूण 72 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. दिनांक 27/03/2014 रोजी झालेल्या छाननीमध्ये वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवारांची एकूण संख्या 45 इतकी असून छाननीअंती पुढील 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये कटके अशोक रामचंद्र, मिलिंद भगवान सिध्दगणेश, पवडय्या शेखरय्या स्वामी, कसबे - पाटील संतोष दादासो या उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत.
 
Top