बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील क्रिडोत्तेजक मंडळ व पतंजली योग समिची यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान मोफत योग प्राणायाम शिबीराचे आयोजन केल्याची माहिती मार्गदर्शक अनिल वेदपाठक यांनी दिली.
    भगवंत मैदान येथील क्रीडोत्तेजक मंडळाच्या हॉलमध्ये हे शिबीर होत असून हृदयरोगतज्ञ डॉ.लक्ष्मीकांत काबरा यांच्या हस्ते व पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिलांसाठी योगाभ्यास काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महिलांचे दैनंदिन आरोग्य, पित्तविकार, अपचन, स्थूलता, पाठ व कंबरदुखी इत्यादींसाठी उपयुक्त योगासने, प्राणायाम, आहार यांची माहिती देण्यात येत आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्हि.तिरुपती, मधुसूदन चांडक, डॉ.कालिदा लिमकर, रावसाहेब यादव, लक्ष्मण वाघमारे, आदिनाथ जमदाडे, वसुधा सुलाखे, सीमा रुद्रवार आदी प्रयत्न करीत आहेत. अधिक माहितीसाठी ९३७१५८६५२४, ९४२१०२७३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top