बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सविता गुरव-कुर्ले लिखीत स्वप्नातील शाळा या कविता संग्रहाचे ज्येष्ठ साहित्यीक डॉ.सूर्यकांत घुगरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.निशीगंधा माळी यांच्या हस्ते गुडीपाडवा दिनी प्रकाशन करण्यात येत आहे. सोमवारी दि. ३१ एप्रिल रोजी संत तुकाराम सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत असल्याची माहिती कवि कालिदास मंडळाच्या अध्यक्षा सुमन चंद्रशेखर यांनी दिली. या कार्यक्रमास वायूपुत्र नारायण जगदाळे, नंदा सुर्वे, सतिश काकडे, औदुंबर उकिरडे, हनुमंत कुंभार, सोमनाथ वैद्य, शिवाजी साखरे-वाघ, दिपक गुंड, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिव रामचंद्र इकारे यांनी केले.
 
Top