उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची गुरुवारी छाननी करण्यात आली.  यात  39 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. केंद्रीय निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी   दाखल  अर्जाची छाननी केली.
         नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. रोहन सुभाष देशमुख (अपक्ष, रा.पोहनेर, ता. उस्मानाबाद), प्रताप विलासराव जाधव (अपक्ष, रा.चिलवडी, ता. उस्मानाबाद), रेवण विश्वनाथ भोसले (जनता दल सेक्यूलर, रा. ईट, ता. भूम), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष, रा. उपळा पाटी माकडाचे, ता.उस्मानाबाद)‍,  श्रीमती उज्वला  एकनाथ जाधव(अपक्ष, रा. दासरी प्लॉट, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर, ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे (अपक्ष, रा.शिवाजीनगर, सांजा रोड,उस्मानाबाद), रविंद्र विश्वनाथ गायकवाड (शिवसेना, रा.मु.आष्टा,पो.चिंचोली, ता.उमरगा, सध्याचा पत्ता-जुनी पेठ, उमरगा), इंगळे भिमा आंबादास (अपक्ष,मु.कन्हेरी पो.पार्डी ता. वाशी), पाटील मनोहर आनंदराव (अपक्ष, मु.पो. मंगरुळ ता. औसा, जि. लातूर), ढाले पद्मशील रामचंद्र (बहुजन समाज पार्टी, आर्शीर्वाद निवास, श्री गॅस एजन्सी जवळ न्यू हडको, तुळजापूर जि. उस्मानाबाद), रामजीवन पंढरी बोंदर (अपक्ष,मु. वडगाव (शि), पो. निपाणी ता.कळंब), शिवाजी जगन्नाथ क्षीरसागर (अपक्ष,नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड, बार्शी जि. सोलापूर),विक्रम अशोक सावळे (आम आदमी पार्टी, सावळे चाळ, सोलापूर रोड, मु.पो.बार्शी जि. सोलापूर), शेषकला विनायक पाडूळे (अपक्ष, मु.भिकार सारोळा पो. पळसप ता.जि.उस्मानाबाद) सुशिलकुमार विनायक पाडूळे (अपक्ष, मु.भिकार सारोळा पो. पळसप ता.जि.उस्मानाबाद), मिलींद सोमनाथ रोकडे (भारीप बहुजन महासंघ, कामठा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद), उमाजी पांडूरंग गायकवाड (अपक्ष, मु.पो. औराद ता.उमरगा, जि. उस्मानाबाद), पद्मसिंह बाजीराव पाटील (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, मु.पो.तेर ता,जि.उस्मानाबाद ), डॉ. रमेश सुब्बाराव बनसोडे ( रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, नगर परिषद समाजमंदीरजवळ, भीमनगर, उस्मानाबाद), ज्ञानदेव श्रीमंत रणदिवे (शिवराज्य पक्ष , मु.पो. सारोळा बु. ता.जि.उस्मानाबाद), शेषराव त्रेंबकराव पाटील (अपक्ष,मु.पो.तपसे चिंचोली,ता.औसा, जि.लातूर), राणा जगजितसिंह पाटील (अपक्ष, मु.पो. तेर ता,जि. उस्मानाबाद), रविंद्र विश्वनाथ गायकवाड (अपक्ष, मु.पो. डिग्गी, ता.उमरगा जि.उस्मानाबाद), सिद्दीकी इब्राहीम बौडीवाले (अपक्ष,मु.पो.बेंबळी ता.जि.उस्मानाबाद), शेख वाजेद अब्दुल करीम (अपक्ष, सावरकर चौक, अरब गल्ली, उस्मानाबाद), तुकाराम दामु गंगावणे ( अपक्ष, मु.पो.ता. परंडा जि. उस्मानाबाद), रवि रत्नाकर होनराव (अपक्ष, मु.पो. कोरफळे,ता.बार्शी जि. सोलापूर), तुपसुंदरे बालाजी बापूराव ( अपक्ष, विकास नगर, उस्मानाबाद), धनंजय उत्तम सावंत (अपक्ष, मु.पो. सोनारी ता. परंडा जि.उस्मानाबाद), विजय मारुती क्षीरसागर (अपक्ष, मु.पो. तीर्थ खुर्द ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद),  शेख मुबारक मैनोद्यीन (अपक्ष, सांजा रोड, उस्मानापूरा ता,जि.उस्मानाबाद), काकासाहेब बाबुराव राठोड    ( अपक्ष, समता नगर, उस्मानाबाद) , अल्ताफ हुसेन येणेगुरे (अपक्ष, किशन चौक, माळी गल्ली, मुरुम ता.उमरगा, जि.उस्मानाबाद), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (अपक्ष, मु.पो. तेर ता,जि.उस्मानाबाद), तरकसे पुष्पा मुरलीधर ( हिंदुस्थान निर्माण दल, मु.पो. मेंढा, ता,जि, उस्मानाबाद), राजेंद्र भैरवनाथ शिंदे ( महाराष्ट्र परिवर्तन सेना (टी), रा. खासापूरी नंबर दोन, ता. परंडा जि. उस्मानाबाद), पद्मसिंह विजयसिंह मुंडे (अपक्ष, मु.पो.वडगाव (ज), ता.कळंब, जि. उस्मानाबाद), सय्यद मोहम्मद सय्यद इब्राहीम (बहूजन मुक्ती पार्टी, आजाद नगर, परळी  ( वैजनाथ), जि.बीड), अॅड. शैलेंद्र रामेश्वर यावलकर ( समाजवादी पार्टी, आनंद नगर, उस्मानाबाद)
     छाननी मध्ये सचिन मच्छिंद्र इंगोले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मु. रुई पो. पिंपळगाव    ( क), ता. वाशी ) आणि  शिंदे जितेंद्र मारुतीराव (शिवसेना, बालाजी नगर, उमरगा, जि. उस्मानाबाद) यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
 
Top