उस्मानाबाद :- जिल्ह्यातील 41 पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस अधीक्षकांनी पदोन्नती दिली आहे. यामध्ये 10 जणांची साहाय्यक फौजदारपदी, 14 जणांची पोलिस हवालदारपदी तर 17 जणांना पोलिस नाईकपदी बढती देण्यात आली आहे.
    पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी 10 हेडकॉन्स्टेबलना साहाय्यक फौजदारपदी बढती दिली आहे. यामध्ये अविनाश अदलिंगे (उमरगा), गोकुळ गिरी (उमरगा), शिवाजी बनसोडे (शिराढोण), सुरेश काटकर (बेंबळी), दिनकर जामदार (ढोकी), सुरेश जाधव (कळंब), शोभा पवार (उमरगा), अनिल गंगावणे (मुख्यालय), दिलीप हुंडेकरी (वाशी), बाजीराव बळे (परंडा) यांचा समावेश आहे. पोलिस नाईक ते पोलिस हवालदारपदी पदोन्नती मिळालेल्यांमध्ये डी. डी. साबळे (मुरुम), आर. एन. लोहार (मुख्यालय), बी. व्ही. चव्हाण (परिवहन विभाग), डी. डी. जाधवर (परिवहन विभाग), ए. पी. डुकळे (भूम), डी. जी. गंभीरे (बॉम्बशोधक पथक), एस. एस. घोळसगावे (मुरुम), ए. एस. गणेश (कळंब), एच. जी. पुरके (उस्मानाबाद शहर), डी. आर. पवार (मुख्यालय), पी. बी. गायकवाड (मुरुम), व्ही. ए. कोळी (तुळजापूर), एम. आर. काळे (मुख्यालय), एस. जी. कोळेकर (कळंब) यांचा समावेश आहे. याचबरोबर 17 पोलिस शिपायांना पोलिस नाईकपदी बढती देण्यात आली आहे. यामध्ये जे. एस. राठोड (तुळजापूर), एम. बी. राऊत (मुख्यालय), एस. टी. राठोड (उस्मानाबाद ग्रामीण), के. एन. कोळी (कळंब), बी. ए. मेदने (कळंब), आर. ए. बळवंत (परंडा), सी. डी. नरसिंगे (मुख्यालय), एल. आर. शिंदे (मुख्यालय), एस. बी. खोत (कळंब), के. आर. राऊत (मुख्यालय), एन. जी. गवळी (उस्मानाबाद शहर), व्ही. बी. साबळे (मुख्यालय), एस. पी. गायकवाड (मुख्यालय), जी. एस. पवार (मुख्यालय), एस. एल. तोटावार (उस्मानाबाद ग्रामीण), एच. एन. पापुलवार (मुख्यालय) व सी. सी. कोनगुलवार (मुख्यालय) यांचा समावेश आहे.
 
Top