उस्मानाबाद -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेची उमेदवारी अखेर जिल्हाप्रमुख रविंद्र गायकवाड यांना जाहीर करण्यात आली आहे. त्‍यांच्‍या निवडीबद्दल उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करुन आनंदोत्‍सव साजरा केला.
    शिवसेनेच्या उमेदवारीसाठी एकूण सातजण इच्छुक होते.शेवटच्या टप्प्यात जिल्हाप्रमुख रविंद्र गायकवाड आणि आ.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात मोठी चुरस होती.अखेर पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शुक्रवार रोजी रविंद्र गायकवाड यांच्या नावाची घोषणा  केली आहे.
 
Top