पांगरी (गणेश गोडसे) :- पाठीमागील भांडणाच्या कारणावरूण दोन गटात लोखंडी गज काठया व दगडाने झालेल्या तुफान हाणामारीत दोन्ही गटातील आठजण गंभीर जखमी होऊन रोख रक्कम हिसकावुन नेल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे घडली.
    शामराव दादाराव कोठावळे, गणेश कोठावळे, सागर बाळासाहेब बारंगुळे (वय 26), पांडुरंग नानासाहेब पाटील, अतुल गायकवाड, प्रविण शिंदे, धनंजय शिंदे, महादेव कोंढारे अशी दोन्ही गटातील जखमींची नांवे असुन त्याच्यावर बार्शीच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परस्परविरोधी फिर्यादिवरूण दोन्ही गटाच्या 34 जनांविरूध्‍द जिवे ठार मारण्‍याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आज रविवारी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्‍यात आले आहे.
      शामराव दादाराव कोठावळे (वय 56, रा. नारी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी अमोल अनिल रानमाळ, दादासाहेब विजय कुरूंद, सागर बाळासाहेब बारूंगळे, समित सुरेश बदाले, विकास बदाले, पप्पु उर्फ प्रविण काकासाहेब शिंदे, लखन वैजिनाथ शिंदे, पांडुरंग नानासाहेब पाटील, धनाजी राजेंद्र शिंदे, गणेश जगन्नाथ शिंदे, अनिल भास्कर बारूंगळे, महादेव प्रकाश कोंढारे, आबा मोहन शिंदे, फुलचंद काकासाहेब बारूंगळे, अतुल नामदेव बदाले, सुरज अरूण मोरे व बंटया शहाजी गायकवाड यांनी संगनमत करून गैरकायदयाची मंडळी जमवुन हातात लोखंडी गज, काठयाख्‍ दगड घेऊन फिर्यादिचे पानटपरी व रसवंती पत्राशेडमध्ये घुसुन मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादिससह त्याचा मुलगा गणेश यास यास गच्चीला पकडुन खाली ओढुन लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या खिशातील रोख 38 हजार रूपये जबरदस्तीने काढुन घेऊन पानटपरी व रसवंती गृहावर दगड मारून नुकसान केले.
    सागर बाळासाहेब बारंगुळे (वय 26, रा.नारी) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी राजेंद्र भालचंद्र जाधव, रामराजे बळी कोठावळे, गणेश भाऊ कोठावळे, काका भाऊ कोठावळे, नानासाहेब बाळासाहेब कोठावळे, महेश रामराजे कोठावळे, बालाजी हनुमंत कोठावळे, सौदागर उध्‍दव जाधव, बाबा बब्रुवान कोलते, संदिप विष्णु गवळी, सुनिल तुळशीराम बावळे, धनंजय धोंडिराम क्षिरसागर, विठ्ठल दादाराव कोठावळे, अजित हनुमंत कोठावळे, राहुल राजेंद्र गवळी, अविनाश बब्रुवान कोलते व स्वप्नील दत्तु कोलते यांनी संगनमत करून गैरकायदयाची मंडळी जमवुन हातात दगड, गंजख्‍ काठया घेऊन फिर्यादी हा घरात असताना तेथे अनाधिकृतपणे प्रवेश करून शिवीगाळ करत तु गावात पुढारपण करतो काय असे म्हणत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दगड व काठीने मारहाण करत घरातील प्रापंचिक वस्तुंची मोडतोड करत घरातील कपाटात ठेवलेले 55 हजार रूपये जबरदस्तीने काढुन घेतले व परत आमचा नाद केल्यास तुमचा वंश संपवीन अशी धमकी दिली.
    दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादिवरूण दोन्ही गटातील 34 जणांविरूदध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.डी.होवाळ हे करत आहेत.
 
Top