नळदुर्ग -: सलगरा दिवटी (ता. तुळजापूर) येथील विवाहितेच्‍या खूनप्रकरणी सोमवार रोजी चौघा आरोपींना शुक्रवार दि. 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहे. यापर्वी विवाहितेच्‍या नव-यास पोलिसांनी अटक केले असून तो सध्‍या पोलीस कोठडीत आहे.
      मयत विवाहितेचा नवरा बळीराम लोमटे, महादेव लोमटे, प्रशांत लोमटे, सुदामती लोमटे, सुरेखा लोमटे (सर्व रा.सलगरा दिवटी ,ता.तुळजापूर) असे पोलिस कोठडी सुनावण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्‍यातील सलगरा दिवटी येथील संगीता उर्फ छकू नामदेव भांडवे हिचा गावातीलच बळीराम दादाराव लोमटे याच्याशी तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता.  तिला  मुल होत नाही, या कारणावरून झालेल्या भांडणामुळे संगिता हि माहेरी  राहत होती. पती-पत्नीचे भांडण महिला तक्रार निवारण व तुळजापूर न्यायालयात न्‍याप्रविष्‍ठ होते. बळीरामने २६ फेब्रुवारी रोजी गावातच असलेल्या त्‍याच्‍या  सासरवाडीत जाऊन संगिताला नांदवितो, भांडण होणार नाही, असे सांगून घरी आणले. लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर, हातावर, शरीरावर जबर मारहाण करून ठार करून अनिल जगन्नाथ लोमटे यांच्या विहिरीत फेकून दिले. हा प्रकार मयत मुलीचे वडील नामदेव बंकट भांडवे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता मुलीचा खून झाल्याचे समोर आले. यानंतर भांडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरूध्द नळदुर्ग पोलिसात ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संगीताच्‍या नवर्‍यास अटक केले होते. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदामती लोमटे, महादेव लोमटे, प्रशांत लोमटे, सुरेखा लोमटे या चौघाना  पोलिसांनी रविवारी रात्री अटक करून त्‍यांना  सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपीना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
Top