बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील संघर्षयात्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईतील आदित्य कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. यावेळी नंदन जगदाळे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील, नगरपरिषदेच विरोधीपक्षनेते अरुण बारबोले, मधुकर फरताडे, रावसाहेब मनगिरे, अशोक सावळे, नगरसेवक दिपक राऊत, काका फुर्डे, महावीर कदम, हनुमंत धस, संयोजक किशोर मांजरे आदी उपस्थित होते.
    दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेकरिता धुळे, मुंबई, नाशीक, संभाजीनगर (औरंगाबाद), कोल्हापूर, अहमदनगर, बीड, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा यासह विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. जी.पी.कदम, सचिन वायकुळे, ए.बी.कदम यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धा सुरु झाल्यानंतर अवकाळी पावसाने बार्शीकरांना दणका दिला परंंतु थोडे थांबून का होईना अत्यंत चांगल्या सुरु असलेल्या या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद रसिक श्रोत्यांनी घेतला.
    या स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक आदित्य कुलकर्णी (मुंबई), द्वितीय रोहित देशमुख संभाजीगर (औ.बाद), तृतीय विभागून अफसर शेख, अ.नगर, मारुती जाधव पंढरपूर, चतुर्थ ज्ञानेश्वर काशीद बीड, उत्तेजनार्थ संतोष आहिरे धुळे, कु.काजल बोरस्ते नाशीक, कु.शिवलिला पाटील, विशेष पुरस्कार धनश्री पाटील अंजनगाव वय १० यांना गौरविण्यात आले.
          कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज ढगे, विनोद वाणी, विकास भालके, उमेश काळे, विजयश्री पाटील, राजश्री डमरे, विनोद काटे, सचिन पवार, अविनाश जाधव, प्रशांत मते, अभिजीत गाढवे, मुन्ना काझी यांनी परिश्रम घेतले.
 
Top