बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील अमर शेख चौकात २८ फेब्रुवारी रोजी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी पोलिस नाईक परशुराम शिंदे यांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
    भ्रष्टाचारी मंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करतांना जिल्हाधिकारी यांचा आदेश पाळला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पो.नि. भोस हे करीत आहेत.

लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलींस पळविले 
बार्शी -: येथील औद्योगिक वसाहतीमधील खाजगी कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍याच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देऊन पळविल्याची फिर्याद तिच्या पालकांनी बार्शी पोलिसांत दाखल केली आहे.
    अल्पवयीन मुलीची लहान बहिणदेखिल सोबत गेल्याने दोन्ही मुलींचा शोध घ्यावा असे तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या तक्रारीत एका संशयीताचे नाव देण्यात आले असून सदरचा आरोपी मुलीच्या मोबाईलवर सातत्याने मेसेज देत असल्याचे व फिर्यादी रात्री झोपल्यानंतर मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या घटनेचा पुढील तपास पो.स.ई. एस.एस.धस या करित आहेत.

गळफास घेऊन आत्महत्या
बार्शी  : येथील आडवा रस्ता परिसरातील विवाहितेने घरातील लाकडी वाशाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उषा मन्मथ लुंगारे असे मयत विवाहितेचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण घरच्या व्यक्तींनाही समजू शकले नाही. बार्शी पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.
 
Top