बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अवकाळी पावसाने नुकसान झालेलय शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
    सर्वत्र दोन तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या ज्वारी, कांदा, हरभरा, गहू, द्राक्षे, लिंबोनी, केळी, आंबा, चिकू यासह पिकांचे नुकसान झाली आहे. या शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने तातडीने शासकिय मदत जाहीर करावी अन्यथा शेतकर्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकर्‍यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन एकरी ३० हजार व बागायतदारांना एकरी ५० हजारांची मदत जाहीर करावी अन्यथा शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागेल असे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
    यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड, तालुकाध्यक्ष विकास गव्हाणे, तात्या शिंदे, धनाजी जाधव, कैलास जाधव, अभिमन्यू गायकवाड, मुस्सा मुलाणी, उमेश मारकड यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top