उस्मानाबाद :- अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीची केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी रविवार दि. 9 मार्च रोजी पाहणी केली. रात्री झालेल्या पावसामुळे शेत शिवारात चिखल झाला आहे. मात्र, घोटाभर चिखलातून मार्ग काढत, तसेच बैलगाडीतून शरद पवार यांनी द्राक्ष बागेची पाहणी करून परतल्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची विदारकता सांगितली. यावेळी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सोबत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपटीने प्रचंड हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार शनिवारी दुपारी विमानाने उस्मानाबाद दौर्यावर येणार होते. परंतु, अवकाळी पावसाचा त्यांच्या हवाई दौर्याला फटका बसला. सायंकाळी उशिरा त्यांचा दौराच रद्द झाल्याच्या बातम्या आल्या. मात्र, शरद पवार कारमधून उस्मानाबादेत दाखल झाले. रात्र झालेली असल्याने त्यांनी नुकसानीच्या पाहणीचा शनिवारी होणारा दौरा रद्द केला. मात्र, रविवारी सकाळी साडे सात वाजताच शरद पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी कळंब तालुक्यातील वडगाव शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. वडगाव येथील शेतकरी दत्ता मुंडे व नवले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करून शेतकर्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकरी दत्ता मुंडे यांनी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली.
वडगाव शिवारात नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे पावसामुळे शक्य नव्हते. यासाठी बैलगाडीची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील गाडी नुकसानग्रस्त बागेपर्यंत घेऊन गेले. मात्र, काही अंतर चालणे भाग होते. रात्रीच्या पावसामुळे चिखल निर्माण झाला होता. यामुळे नेत्यांना चिखलातून मार्ग काढत बागेपर्यंत पोहोचावे लागले. त्यामुळे बूट घोट्यापर्यंत चिखलाने माखले होते. परतताना गाडी चिखलात रुतेल म्हणून नेत्यांनी बैलगाडीतून प्रवास केला.
पाहणी केल्यानंतर पवार यांनी थेट पंतप्रधानांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. अवकाळी व गारपिटीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या हाहाकाराबाबत माहिती दिली. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडून गेलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी विनंती केली.