कळंब -: मतदान हा भारतीय नागरिकाचा हक्‍क आहे. मतदारांना निवडणुक प्रक्रियेचे महत्‍व ज्ञात व्‍हावे, प्रत्‍येक भारतीयांची मतदान नोंदणी व्‍हावी व समाजाच्‍या सर्व घटकामध्‍ये मतदान जागृती निर्माण व्‍हावी, याकरीता कळंब येथील जि.प. प्रशाला (मुलांची) च्‍यावतीने रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. ही रॅली शहरातून काढण्‍यात आली. 'मतदानाचा हक्‍क पवित्र हक्‍क, मी तो बजावणारच, मतदान करु, राष्‍ट्र उभारु' अशा घोषणा देण्‍यात आल्‍या. रॅलीमध्‍ये विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग नोंदवला. 
     यावेळी श्रीमती एम.स. इनामदार, श्रीमती अस्‍मानी, मोमीन, जी.एम. शेळके, एस.आर. शाह, आर.एस. पवार, टी.एन. काझी, ए.सी. डांगे, श्रीमती व्‍ही.बी. बांगर, श्रीमती आय वाघमारे, श्रीमती एम.एन. पवार आदी शिक्षकांनी या रॅलीमध्‍ये सहभाग नोंदविला
 
Top