मुंबई -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आठव्या वर्धापनदिन सोहळयाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची आपली भूमिका जाहीर केली. मनसेचे निवडून आलेले खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असे राज यांनी सांगितले.
या कार्यक्रमात राज यांनी मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. मनसे प्रभावहीन झाली असून, आगामी निवडणूकीत मनसेचा निभाव लागणार नाही अशी बोचरी टीका शिवसेनेकडून सुरु आहे. मात्र राज यांनी योग्यवेळी आपण सर्व विषयांवर भाष्य करु असे सांगत टीका करण्याचे टाळले. आगामी निवडणूकीत मनसे आपली ताकत दाखवून देईल. तुम्ही लोकसभा निवडणूकांच्या कामाला लागा असे राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या कार्यक्रमात राज यांनी मनसेच्या मोबाईल अॅपचे लॉंन्च केले तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसात ते राज्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांची भेट घेणार आहेत. मनेसची दुसरी उमेदवार यादी पुढल्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल.
मनसेची उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई- आदित्य शिरोडकर
उत्तर-पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण-डोंबिवली -राजू पाटील
शिरुर – अशोक खंडेभराड
नाशिक – डॉ.प्रदीप पवार
पुणे – दीपक पायगुडे