उमरगा (लक्ष्मण पवार) :- येथील आरोग्य नगर परिसरातील एका सुशिक्षित युवकाने चौदा वर्षापासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत ज्यूसचे वाटप शनिवार दि. 8 मार्च रोजी करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील आरोग्य नगर परिसरात राहणारा संजय मारुती वाडीकर हा सुशिक्षित युवक गेल्या चौदा वर्षापासून महिला दिनादिवशी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत वाडीकर ज्यूस सेंटरचे उदघाटन करण्यात येते. यावर्षी सुभाष येळीकर, बंडू पवार, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. मिनाक्षी राऊत, शाखाप्रमुख सौ. वत्सलाबाई कोरे, सौ. विद्याबाई कलशेट्टी, सौ. कविता आगसे, सौ. चंद्रकला चव्हाण, रजीयाबी मुल्ला यांच्यासह संजय वाडीकर, गोरख घोडके, शिवराम चव्हाण, सुरज वाडीकर, सुजीत वाडीकर, शंकर लोहार, मज्जू बागवान, दगडू कांबळे यांची उपस्थित होती. महिला दिनाचे औचित्य साधून मोफत ज्युसचे वाटप करीत असल्याबद्दल संजय वाडीकरचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहअ