बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उस्‍मानाबाद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र गायकवाड यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर बार्शीतील श्री भगवंताचे दर्शन घेतले व नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना भगवंताची कृपादृष्टी आवश्यक असल्याचे सांगत यंदा कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकणारच असा विश्वास व्यक्त केला.
    शहरात आगमन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भगवंताच्या दर्शनानंतर, दर्गाह व इतर धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन पुढील नियोजित दौर्‍याप्रमाणे परंडाकडे प्रयाण केले.
    यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला जिल्हा प्रमुख अस्मिताताई गायकवाड, महिला तालुका प्रमुख मंगलताई पाटील, शोभाताई सुरवसे, मनिषा विभुते, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, वैराग विभाग प्रमुख संतोष गणेचारी, तालुका प्रमुख काका गायकवाड, आर.पी.आयचे श्रीधर कदम, तानाजी बोकेफोडे, भाजपा चे धनंजय जाधव, सुनिल गोलकोंडा, स्वामी, शहराध्यक्ष दिपक आंधळकर, ता.उ.प्र. बाळासाहेब पवार, विभाग प्रमुख धीरज पाटील, अविनाश शिंदे, राजकुमार पाटील, मालोजी देशमुख, दिगांबर कानगुडे, देवा दिंडोरे, महादेव नलावडे, प्रविण कदम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
    गायकवाड म्हणाले, मी माळकरी माणूस आहे पंढरपूर ऐवजी बार्शीतील भगवंताचे दर्शन घेतले आहे कारण दोन्ही एकाच विष्णुची रुपे असून भगवंताची कृपादृष्टी आवश्यक आहे. महायुतीच्या आघाडीतील इतर मित्र पक्षदेखिल आपल्यासोबत असून एखादा इकडे तिकडे गेला तरी इतक्या मोठ्या लोकसंख्या व मोठ्या कार्यक्षेत्राचा विचार करता ते गृहित धरावे लागते यामध्ये इतरही पक्षांचे काही पदाधिकारी आपल्या महायुतीमध्ये येणार आहेत. शिवसेना पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळावे याकरिता चांगल्या सक्षम अशा सहा उमेदवारांनी प्रभावीपणे मागणी केली याउलटल राष्ट्रवादीला एकही सक्षम उमेदवार मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित असलेल्या शिवसेनेमध्ये पक्षनिष्ठेलाच व लोकांच्या कामांना प्राधान्य आहे पैशाचा विचार केला जात नाही हे देखिल स्पष्ट आहे. विरोधकांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना पक्ष मजबूत आहे. राज्यातून मोठ्या संख्येने लोकसभेत उमेदवार निवडून जातील असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
Top