बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने तुळजापूर रस्त्यावरील वीरशैव लिंगायत रुद्रभूमीत (स्मशानभूमीत) तीस लक्ष रुपयांच्या अंतर्गत डांबरी रस्त्याचे व शौचालय, स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
    मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या रुद्रभूमीत अनेक समस्या होत्या. मागील काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने संरक्षक भिंत, दिवाबत्ती लाईट, निवारा शेड, पाण्यासाठी कुपनलिका, वृक्षारोपन, दरवाजा, मधल्या काळात तलावातील मुरुम टाकून कच्चे रस्ते बनविण्यात आले आहेत. गरजा व समाजाच्या मागणीनुसार येणार्‍या काळात संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, आजूबाजूच्या नागरिकांसाठी बाहेरच्या बाजूला सार्वजनिक शौचालये, अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साधनसामग्री व रखवालदार निवासाकरिता खोल्या, शिवमंदिर, ध्यानमंदिर, बैठक व्यवस्था, वृक्षारोपन आदी कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत.
    आमदार दिलीप सोपल, माजी खासदार बापू कांबळे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगराध्यक्ष कादर तांबोळी यांच्याकडून वेळोवेळी स्मशानभूमी सुधारणेसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रुद्रभूमीतील विविध सुधारणांसाठी माजी आमदार बाबुराव नरके, राष्ट्रवादी गटनेते नागेश अक्कलकोटे, राजाभाऊ माळगे, बाबासाहेब कथले, नंदकुमार होनराव, रामलिंग घाळे, बाळासाहेब आडके, मल्लिनाथ गाडवे, बसवेश्वर गाडवे, गौरीशंकर बेणे, डॉ.थळपती, डॉ.भुजबळ, चिपडे सर, विभुते सर, अनिरुध्द चाटी सर, नागेश लामतुरे, हिंमगरे, आबा घडमोडे, शंकरराव चौगुले, प्रभुलिंग स्वामी, ऍड. विलास ठोकडे, अशोक घोंगडे, रविंद्र मेनकुदळे, विवेक देवणे यांनी प्रयत्न केले आहेत. अनेकांनी वेळोवेळी श्रमदान करुन स्मशानभूमीची स्वच्छता केली आहे.
 
Top