बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) व आयटक कामगार केंद्र,बार्शी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शोभायात्रा व स्त्री भृण हत्या, अत्याचार विरोधात पथनाट्य, खाऊ वाटप व महिलांच्या समस्येवर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले.
शनिवारी भगवंत मैदान येथून महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक युवतींनी प्रबोधनात्मक पोस्टर्ससह मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. साधना कन्या प्रशाला, सौ.माई सोपल विद्यालय, शिवाजी महाविद्यालय, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, सुलाखे हायस्कूल, हिराचंद नेमचंद कन्या प्रशाला, नर्सिंग महाविद्यालय, अँग्लो उर्दू, बार्शी टेक्निकल हायस्कूल आदी शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होते. शोभायात्रेच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, कॉंम्रेड सरिता कुलकर्णी, कॉं.ए.बी.कुलकर्णी, सचिन वायकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ.मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल श्रमिक संघ, सचिन गावसाने, जय शिवराय प्रतिष्ठान व मोबाईल असोसिएशनच्या वतीने शोभायात्रेत खाऊ वाटप केले.
आयटक कामगार केंद्र येथे डॉ.चंदा सोनकर - काशीद यांचे महिलांच्या विविध समस्येवरील प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शौकत शेख, कॉं.प्रविण मस्तुद होते. महिलांची जातीय वर्गीय, लैंगीक व मानसिक गुलामगिरी यावर श्रमिक महिलांनी सावित्रीबाई यांच्या विचारांना प्रेरणा मानत आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बुलंद आवाज करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आजम शेख, लहू आगलावे, अमोल माने, तस्लीमा शेख, किरण मुंढे, वीणा राऊत, र्गीेश कोळी, प्रदीप गुळवे, धनंजय शिंदे, अमोल भालशंकर, उत्रेश्वर अवघडे, रतन कांबळे, साधना वाघमारे, शारदा पंढरपूरे, सौ.लिंगे, सौ.स्वामी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनायक माळी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रविण मस्तूद यांनी मानले.