बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पक्ष नेतृत्वाने उंदड प्रेम दिले, पक्षावर निष्ठा ठेऊन यापुढेही काम करणार, नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ घ्यावा, अवकाळी पाऊस ग्रस्त शेतकर्‍यांना मदत करणार, लोक समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाची स्थापना करणार आणि यापुढेही राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे आरएसएसम उदयोग समुहाचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी म्हटले.
      समर्थकांसमोर भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. धाराशिव जिल्हा परिषदचे गटनेते दत्तात्रय सांळुखे, शिवाजीराव पवार, शंकरराव इथापे, अजित कुंकूलोळ, शिवसेना वैराग शहर प्रमुख संतोष गणेचारी आदी उपस्थित होते. मिरगणे म्हणाले, समाजाचे देणे लागतो या भावनेने सुरु केलेले लोकसेवेचे व्रत आयुष्यभर करणार आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही शिवसेना पक्षाचे कार्य यापुढेही करत राहणार आहे. आपल्या समर्थकांसमोर भूमिका मांडण्यासाठी हा मेळावा आहे. समाजऋण फेडण्यासाठी लोकसेवा करतो आहे. उमेदवारीसाठी दुराग्रही भूमिका घेतली नाही त्यामुळे पक्ष नेतृत्वाचे मला पाठबळ आहे. पक्षनेतृत्वाने मला उंदड प्रेम दिले. सामाजिक कार्य हे निस्वार्थी भावनेने करत राहणार. आज हजारो लोकांच्या माझ्याकडून मोठया अपेक्षा आहेत. मला समाजाच्या सेवेसाठी राजकारण करायचे आहे. मला स्वत:च्या हितासाठी कसल्याही पदाची गरज नाही. कोणतीही सत्ता नसली तर लोकांचे प्रेम मला मिळाले आहे. त्यामुळे आता तालुक्यात जनसंपर्क कार्यालय काढून वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्या सोडविणार आहे. राजकारण आणि प्रशासनातील संबंध जनहितासाठीच यापुढेही वापरणार आहे. दिनांक १३ मार्च रोजी होणार्‍या नेत्र चिकित्सा शिबिरात आधिकाधिक गरजूंना आणण्यरसाठी सहकार्य असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुक्यातील अवकाळी पाऊस ग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसाणीची पाहणी करुन त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. मला उमेदवारी मिळावी यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील हजारो शिवसैनिक, मित्र, हितचिंतकांनी, आग्रह केला. त्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून प्रचंड निराशा व्यक्त केली. अनेकजण रडले अनेकांना भावना अनावर झाल्या. त्यांच्या प्रेमातून उतरायी होण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. या सर्व बांणधवाशी हितगुज साधावे आणि हे ऋणांनुबंध आयुष्यळर जपण्यासाठी मेळावा घेतल्याचे सांगितले. या मेळाव्यास बार्शी व धाराशिव जिल्हयातील नागरिक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या भर पावसात अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अविनाश पोकळे, दत्तात्रय जाधव, बिभिषन पाटील, पंडित मिरगणे, बाळासाहेब पवार, मदन गव्हाणे, श्रीराम सुरवसे, शिरिष घळके यांनी परिश्रम घेतले.
 
Top