उस्मानाबाद :- अंघोळीला तलावावर गेलेल्या सातवर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिंगोली तांडा (ता. उस्मानाबाद) येथे घडली.
रोहिदास तुकाराम जाधव (वय 7 वर्षे, रा. शिंगोली तांडा) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. रोहिदास जाधव हा शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास नातलगांसमवेत जवळच असणार्या तलावात अंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खोल पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी अविनाश चव्हाण (रा. जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.