नळदुर्ग -: नळदुर्ग व अणदूर (ता. तुळजापूर) येथे जागतिक महिला दिनानिमित्‍त उल्‍लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सत्‍कार करुन गौरव करण्‍यात आला. 
    नळदुर्ग येथील दमयंती महिला शिक्षण संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुभद्रा मुळे यांचा अखिल भारतीय छावा संघटनेच्‍यावतीने विनिल जांभळे व कार्यकर्त्‍यांनी सत्‍कार केले. त्‍याचबरोबर अणदूर येथील वीर सोमेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकीय क्षेत्रातील शामल वडणे (उस्मानाबाद), सुभद्रा मुळे (नळदुर्ग), महिला शेतकरी राजूबाई कोरे (चिवरी), समाजसेविका छायाताई खरमाटे (तासगाव) व आदर्श शिक्षिका प्रभावती स्वामी (बेंबळी) यांचा संस्थेच्या संचालिका जयश्री स्वामी व मुख्याध्यापिका सीमा ढेपे यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला.
फोटो :  अखिल भारतीय छावा संघटनेच्‍यावतीने दमयंती महिला शिक्षण संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुभद्रा मुळे यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
 
Top