कळंब :- रविवार दि. 9 मार्च रोजी पुन्हा मध्यरात्री कळंब तालुक्यात मोठा पाऊस पडला. महाशिवरात्री पासून दररोज कमी जास्त पाऊस चालूच आहे. रविवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. द्राक्षे, आंबा पपई या फळांचे व गहू, हरभरा, तुरी, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यांनी थोडी उगाड मिळताच गहू काढला, त्यांच्या अक्षरशः घुग-या निघाल्या आहेत. नुकसान झालेल्या पीकांचा पंचनामा करून सकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.