उस्मानाबाद :-  भारतीय निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार स्वीप अंतर्गत मतदाना विषयी जनजागृती व्हावी म्हणून केशेगाव येथे आरोग्य मेळाव्या प्रसंगी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व जनतेने  100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.
    केशेगाव येथे दिनांक 9 मार्च रोजी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत  यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व जनतेला मतदान करण्या विषयी शपथ देण्यात आली. या वेळी डॉ. एस. एस. फुलारी ता. आरोग्य अधिकारी डॉ. किशनराव लोमटे जिल्हा कार्यकम व्यवस्थापक डॉ. एन. के. गाडेकर ,वैधकीय अधिकारी डॉ. मासाळकर, उपअभियंता सतिश कवडे, व विस्तार माध्यम अधिकारी अर्जुन लाकाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते.
 
Top