उस्‍मानाबाद -: येथील पतंजली योग समिती व भारत स्‍वाभिमान न्‍यास यांच्‍यावतीने आयोजित प्राणायम योग साधना शिबिरास मोठ्या उत्‍साहात प्रारंभ झाला. सदरील शिबीर दि. 20 मार्च ते 23 मार्च या कालावधीत शहरातील शरद पवार हायस्‍कूल येथे होत आहे.
          या शिबीराचे उदघाटन जयलक्ष्‍मी शुगर कारखान्‍याच्‍या संचालिका सुरेखा विजय दंडनाईक यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी सुचिता जीवनराव गोरे, नरगसेविका प्रेमलता सुधीर पाटील, सुषमा मिलिंद पाटील, साधना नितीन तावडे, किसान पंचायतचे राज्‍य प्रभारी नितीन तावडे, पतंजली योग समितीचे जिल्‍हा प्रभारी एस.आर. पाटील आदीजण उपस्थित होते.
          योगऋषी स्‍वामी रामदेव महाराज यांच्‍या योग प्राणायामाच्‍या माध्‍यमातून जगामध्‍ये आरोग्‍य जागृती विषयी क्रांती केलेली आहे. त्‍यामुळे आज लाखो लोक आरोग्‍यदायी व सुखी जीवन जगत आहेत. उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात देखील 2005 पासून प्राणायाम योग साधनेचे निरंतर कार्य सुरु आहे. शहरातील विविध भागामध्‍ये नित्‍य वर्ग सुरु आहेत. शहरातील जास्‍तीत जास्‍त लोकांना प्राणायम योग साधनेचा लाभ व्‍हावा, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
   कार्यक्रमाच्‍या प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दिपप्रज्‍वलन करुन शिबीराचा प्रारंभ करण्‍यात आला. पतंजली योग समितीच्‍यावतीने मान्‍यवरांचे स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी सुषमा मिलीेंद पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक  रणजित दुरुगकर यांनी केले. यावेळी राम ढेरे, सतिश पवार, चंद्रकांत गिलबिले, छाया पवार, शरदा ढेरे, सविता मगर, वैजयंती दंडनाईक, सुशिला गिलबिले, दत्‍ता चव्‍हाण, आप्‍पा सोनवणे, मुकुंद कथले यासह योग योग साधक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. 
 
Top